समुद्रात बुडून महिलेचा मृत्यू, फोटोच्या नादात जीव गमावला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून हसू अनावर होतं, तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होतो. काही व्हिडीओ तर इतके भयानक असतात, की ते पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भयभीत होईल. या व्हिडीओमध्ये दोन तरुण समुद्रात बुडालेल्या एका महिलेला किनाऱ्याजवळ आणताना दिसत आहेत. नक्की काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

हरिहरेश्वर समुद्रात महिलेचा मृत्यू

therefore_ritzz या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ऋतुजा नावाच्या एका तरुणीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. ती सांगते, “२३ मार्च, रविवारी सकाळी ९ वाजता हरिहरेश्वर बीचवर फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या एका ग्रुपमधील एक महिला समुद्राच्या किनाऱ्यावरील खडकावर फोटो काढण्यासाठी गेली होती. त्याच वेळी तिचा पाय घसरला आणि ती समुद्रात पडली. मोठ्या लाटांमुळे ती पाण्यात ओढली गेली. सुमारे १५ मिनिटे ती पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण लाटांच्या प्रवाहामुळे ते शक्य झालं नाही. थोड्याच वेळात तेथील स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीला याची माहिती देण्यात आली. दोन तरुणांनी तिला किनाऱ्याजवळ आणलं, पण तोपर्यंत तिने आपला जीव गमावला होता. हा सर्व प्रकार माझ्या डोळ्यांसमोर घडला आणि मी खूप घाबरले!”

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

ती पुढे सांगते, “हा व्हिडीओ शेअर करण्यामागचा उद्देश एवढाच आहे, की हे सगळं एका फोटोच्या नादात घडलं. निसर्गरम्य वातावरणात फोटो काढणं स्वाभाविक आहे, पण निसर्गाने रौद्र रूप धारण केल्यास आपण आपला जीव गमावू शकतो.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “येथील समुद्र नेहमीच खवळलेला असतो. लाटा कधी वाढतील, हे काहीच समजत नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, “हरिहरेश्वरचा समुद्र खूप धोकादायक आहे. लोकं इतकं धाडस कसं करतात, हेच कळत नाही.” आणखी एका युजरने लिहिलं आहे, “निसर्गाच्या कोणत्याही गोष्टीशी खेळू नये.” एका युजरने लिहिलं आहे, “तरीही लोकं सुधारत नाहीत. मोबाईल आणि सेल्फीच्या नादात ते आपला जीव धोक्यात घालतात.” तर दुसरा युजर लिहितो, “हरिहरेश्वरचा समुद्र पाहून पाण्यात जायची हिंमत होत नाही. तिथला प्रदक्षिणा मार्ग तर अत्यंत धोकादायक आहे. आम्ही तर लांबूनच परत येतो.” अनेक युजर्सनी हरिहरेश्वरचा समुद्र खूप धोकादायक असल्याचं सांगितलं आहे.

Leave a Comment