तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान, लाभार्थी यादी जाहीर

Tar kumpan yojana 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजना राबवत. आणि त्याची उत्तम प्रकारे अंमलबजावणी सुद्धा करत असत. अशीच एक योजना सध्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे ती म्हणजे तार कुंपण योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमिनीला तार कुंपण करण्यासाठी अनुदान दिले जाते. आता शेतकऱ्यांना जमिनीला तार कुंपण करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण पिकांचे जंगली प्राण्यांपासून आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी कुंपण केले जाते.

शेतकरी हा खूप मेहनत करून पीक आणतो. त्याच्यासाठी त्याला लागणारा खर्च, बी बियाणे, खत या सर्वांसाठी खर्च होतो आणि जंगली प्राण्यांमुळे किंवा प्राणी प्राण्यांमुळे त्याच्या शेतीचे नुकसान होते. हातात आलेले पीक या प्राण्यांच्या नासामुळे संपून जाते. त्यामुळे ही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने हातात कुंपण योजना आणलेली आहे. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे पाळीव प्राणी आणि जंगली प्राण्यांपासून पिकांची संरक्षण करणे होय.

तार कुंपण योजना काय आहे ते सविस्तर पाहू 

ही डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वनविकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबवली जाते. शेतकऱ्यांना शेतीभोवती लोखंडी काटेरी तार कुंपण करता यावे आणि प्राण्यांपासून होणारे शेती पिकाचे नुकसान टाळावे ही या योजने मागचे उद्देश आहेत. ही योजना विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील लोकांसाठी फार महत्त्वाची ठरते. कारण की अशा ठिकाणी जंगले शेती जवळच असतात आणि जंगलातील प्राण्यांचा शेतीमध्ये शिरकाव हे सहजपणे होतो आणि पिकांची नुकसान होते. त्यामुळे ही योजना जास्त करून दुर्गम -आदिवासी भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते

शेतामध्ये पीक जोमात येते तेव्हा रानडुकरे हरणे वानरे अशा विविध प्राण्यांचा त्रास शेतकऱ्याला जाणवतो. हे जनावरे संध्याकाळी येऊन पिकाची नासाडी करतात.
प्राण्यांनी नासाडी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये जमिनीला तार कुंपण केल्यास ते शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचे ठरते.

तार कुंपण योजनेचे फायदे पाहूया Wire fence Scheme Benefits

  • पहिला फायदा म्हणजे तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातील जास्त पैसा खर्च करण्याची गरज भासत नाही.
  • दुसरा फायदा म्हणजे पिकांचे संरक्षण होते आणि शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा मोबदला योग्य मिळतो.
  • तार कंपनी एकदा शेतामध्ये लावल्याने याचा फायदा अनेक वर्ष होतो त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना पिकाचे टेन्शन राहत नाही.
  • तारकुंपण असल्याने पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि शेतकऱ्याला त्याचा सुद्धा फायदा होतो.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक शेतकऱ्यांना मानसिक शांती मिळते जेणेकरून प्रत्येक वेळेस त्याला टेन्शनमध्ये राहण्याची गरज नाही की पिकाची नासाडी प्राणी करतील म्हणून.

तार कुंपण योजनेचे स्वरूप पाहूया Subsidy for Wire fence Scheme

  • या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार आणि तीच लोखंडी खांब पुरवण्यात येतात.
  • या योजनेसाठी 90% खर्च सरकार करेल आणि उर्वरित दहा टक्के खर्च शेतकऱ्यांना स्वतः करावा लागेल.
  • या योजनेमध्ये दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमध्ये तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत लागणारे कागदपत्रे जोडावी लागतात आणि नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अनुदान तुम्हाला मिळेल.

पात्रता निकष  Wire fence Scheme Eligibility Criteria

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील ते आपण खालील प्रमाणे पाहू

  1. पहिला निकष म्हणजे शेतजमिनीची मालकी ज्या शेत जमिनीवर तुम्हाला तार कंपन करायचे आहे ते तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असणे आवश्यक आहे.
  2. दुसरा नियम म्हणजे ज्या जमिनीवर तुम्हाला तार कंपन करायचे आहे ती अतिक्रमण केलेली नसावी.
  3. त्यानंतर तारकुंपांसाठी निवडलेली जमीन ही वन्यप्राण्यांची राहती जागा नसावी.
  4. या जमिनीवर तुम्ही गेल्या दहा वर्षांपासून शेती व्यतिरिक्त कोणते काम करणार नाहीत याचा ठराव तुम्हाला संमतीकडे सादर करावा लागेल.
  5. नुकसानीचा पुरावा सुद्धा तुम्हाला तिथे द्यावे लागेल.

आवश्यक कागदपत्रे Wire fence Scheme Required documents

  • पहिला कागद म्हणजे तुम्हाला अर्जदाराचा फोटो असलेला ओळखपत्र लागेल म्हणजेच आधार कार्ड मतदान कार्ड.
  • त्यानंतर जमिनीचे सातबारा आणि आठ चा उतारा लागेल.
  • शेतकऱ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर ग्राम परिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र लागेल.
  • जमिनीचा नकाशा लागेल.
  • वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसानीचा पुरावा लागेल.

Leave a Comment