sisters bank account मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या वितरणार सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक महिलांच्या
बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणास सुरुवात झाली आहे.
या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहिना 1500 रुपये या प्रमाणे पैसे पाठवले जातात.
महिलांना आर्थिक मदत व्हावी, हा उद्देश ठेवून ही योजना चालू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले नव्हते.
दरम्यान राज्यात आता महायुतीचं सरकार आलं आहे. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये. लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेंतर्गत 2100 रुपयांची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र अजूनही त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाहीये. यावरून आता विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.
महिलांना आर्थिक मदत व्हावी, हा उद्देश ठेवून ही योजना चालू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले नव्हते.
हेच पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. या लाभ वितरणाबाबत काही दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती.
हेच पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. या लाभ वितरणाबाबत काही दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती.
त्यानंतर आता महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपये आले आहेत. उर्वरित महिलांनी हा लाभ वितरीत करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही मोबईल बँकिंग, इंटरनेट बँकिंगच्या मदतीने लॉग इन करून तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता. तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊनही खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकता. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला मोबाईलमध्ये मेसेजही येतो. त्याद्वारेदेखील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे तपासू शकता.