Sarees for holi festival मित्रांनो आपला तर माहीतच आहे की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो महिलांसाठी विविध योजना ही नेहमीच राबवत असतं. लाडकी बहीण योजना ही विविध राज्यांमध्ये राबवली गेली. त्याप्रमाणे आता राज्य सरकारने सुद्धा लाडकी बहिण योजना महाराष्ट्र मध्ये आणली आणि ती खूप फेमस सुद्धा झाली.
आता या योजनेनंतर राज्य सरकारने अजून एक नवीन योजना आणलेली आहे. अंत्योदय राशन कार्ड धारकातील कुटुंबातील महिलांसाठी आता एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत साडी वाटप होणार आहे.
राज्य सरकारच्या अन्य व पुरवठा विभागाने या योजनेबद्दल निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना एक साडी दिली जाणार आहे.राज्यामध्ये होळीच्या पूर्वी या साड्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन केले जात आहे.
योजनेतील लाभार्थी महिला
राज्यामध्ये यंत्रमाग उद्योग हा मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी राज्यातील राज्य यंत्रमाग महामंडळाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या साड्या हे राज्य यंत्रमाग महामंडळ पुरवणार आहे. या योजनेतील लाभार्थी महिला म्हणजेच अंतर्गत रेशन कार्डधारकांची यादी आता तयार करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यामध्ये साड्यांचे वितरण केले जाणार आहे.
होळी या सणाच्या आधी सर्व महिलांपर्यंत साड्या पोहोचवण्यासाठी नियोजन केलेले आहे . या साड्या महिलांना सणाच्या पूर्वी पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी विविध स्तरांवर काम करत आहेत.
या योजनेचे लाभार्थी ठरवताना राज्य सरकारने फक्त अंतोदय शिधापत्रिका धारक यांनाच लाभ मिळणार आहे. म्हणजे सरसकट सर्व रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार नाही. हे साडी वाटप तुम्ही तुमच्या गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानावर होणार आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मशीनवर अंगठा द्यावा लागेल आणि साडी वाटप होईल.
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की साडी वाटप हे सोप्या प्रकारे व्हावे आणि किती महिलांना मिळाले आहेत हे कळवण्यासाठी ते बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करणार आहे. म्हणजेच आणि त्याचे ठसे घेऊन तुम्हाला साडी वाटप होईल. राज्य सरकारने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत. जसे की माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
मोफत साडी वाटप योजना राबवल्यानंतर राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. या साड्या राज्यातील यंत्रमाग उद्योगांमधून तयार केलेले असणार आहेत. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
ही योजना यशस्वीपणे राज्यात राबवल्यानंतर राज्यातील यंत्रमाग युद्धकाला मोठा याचा फायदा होणार आहे.यंत्रमाग उद्योग हा स्थानिक असल्यामुळे येथील स्थानिक रोजगार उपलब्ध होईल आणि त्यामधून आर्थिक मदत सुद्धा होईल. यंत्रमाग उद्योगाला मिळालेले चालनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल . महिलांच्या हातामध्ये राज्य सरकारने पैसे दिल्यानंतर त्यांच्या घर खर्चाला मदत होते आणि महिलांचे सक्षमीकरण सुद्धा होते.
मोफत साडी वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी काही राज्य सरकारने सूचना जारी केलेल्या ते आपण एक एक करून पाहू
- पहिली सूचना म्हणजे तुम्हाला साडी मिळवण्यासाठी रेशन कार्ड आणावे लागेल आणि ते रेशन कार्ड अंतर्गत रेशन कार्ड असलेच पाहिजे.
- त्यानंतर तुम्हाला ई पास मशीनवर अंगठा देणे
- कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या साडीचा लाभ मिळेल.
- तुम्ही रेशन दुकानातून साडी विकत घेऊ शकत नाहीत किंवा ती इतर कोणालाही देऊ शकत नाहीत.
- मोफत साडी रेशन दुकानावरून घेत असताना जर रेशन धारकाने तुमच्याकडे अतिरिक्त पैसे मागण्यास किंवा इतर कोणत्याही अडचणी आल्यास तुम्ही जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये येऊन तक्रार करू शकता.
- या तक्रारींवर सरकार लगेच हरकत घेऊन संबंधित माणसांवर कारवाई करणार आहे.