Rbi bank license आपल्या राज्यामध्ये आणि देशांमध्ये विविध बँका आहेत काही बँका सरकारी आहेत काही बँका प्रायव्हेट आहेत. काही सहकारी बँक आहेत. या सर्व बँकांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना नियम घालून देण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही काम करते.
आरबीआयचे काम म्हणजे देशभरातील सर्व बँकांवर नजर ठेवणे. या बँका सर्वांनी नियमाचे पालन करतआहेत की नाही हे पाहणे. काही घोळ झाल्यास काही ठेवीदारांचे पैसे बुडल्यास अशांना मदत करणे हे आरबीआयचे काम असते. आरबीआय बँक ही एखाद्या बँकेला बंद सुद्धा करू शकते. त्याचा परवाना रद्द करू शकते म्हणजेच काय की त्या बँकेमध्ये जर काही घोटाळे होत असतील, कामंमध्ये काही चुका असतील लोकांच्या पैशांची काही गलत होत असेल तर अशा वेळेस आरबीआय बँक त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकते.
असंच एक प्रकरण सध्या समोर आलेला आहे ते म्हणजे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय बँकेने कारवाई केलेली आहे. या बँकेवर त्यांनी सहा महिन्यांसाठी बँकिंग व्यवहार करण्यासाठी बंदी घातली आहे. या घातलेल्या अचानक बंदीमुळे त्या बँकेमध्ये असणाऱ्या लोकांचे खाते ठेवीदार कर्जदार हे थोडे सध्या अडचणीत आलेले आहेत. या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे संपूर्ण देशभरामध्ये 26 शाखा आहेत.
या बँकेचे जास्त करून शाखा आहे ह्या महाराष्ट्रात आहेत पुण्यापासून ते पालघर पर्यंत अशा विविध ठिकाणी यांच्या शाखा आहेत या सर्व शाखांमध्ये व्यापारी शेतकरी मध्यमवर्ग कुटुंब यांनी आपल्या आयुष्यभराची बचत ठेवी ठेवलेली आहे आरबीआय ने केलेल्या कारवाईमुळे आता या सर्व लोकांचे पैसे बँकेमध्ये अडकून पडले आहेत बँकांच्या समोर पैसे काढण्यासाठी लोक गर्दी करत आहेत आरबीआय ने घालून दिलेल्या नवीन नियमानुसार खातेदार आता काही मर्यादित रक्कमच काढू शकतात. खातेदारांना सर्व रक्कम काढायची सध्या परवानगी नाही.
पुढील प्रक्रिया काय असेल ?
- परंतु आता कर्जदारांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कोणतीही बँक बंद पडते, तेव्हा त्यांची सर्व खाते हे दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर केली जातात.
- या बँकेतील सर्व खाते आता एकाच दुसऱ्या किंवा विविध दुसऱ्या बँकांमध्ये ट्रान्सफर केले जातील.
- जेव्हा तुमचे अकाउंट ट्रान्सफर होईल तेव्हा नवीन बँक तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती घेऊन नोटीस पाठवते.
- अकाउंट ट्रान्सफरच्या आधी तुम्हाला सर्व कागदपत्रांवर तुमची साईन घेतली जाते.
तुमच्या कर्ज आणि हप्त्याचे काय होईल ?
- जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलेला असेल आणि ती बँक पडली असेल तर तुमचे खाते दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले जाईल आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढे हप्ते भरलेले आहेत कर्जाचे ते ग्राह्य धरले जातात.
- नवीन बँकेचा अकाउंट ट्रान्सफर झाल्याने तुमच्या हप्त्यांची रक्कम व्याजदर आणि इतर नियमानंबाबत स्पष्ट माहिती देते.
- जेव्हा तुमचे नवीन बँकेत खाते ट्रान्सफर होईल तेव्हा तुमच्या अकाउंट मधून पैसे काढण्याच्या आधी तुम्हाला पूर्व सूचना दिली जाईल.
- सामान्यतः तुमच्या जुने बँके मन कडून जे कर्ज घेताना नियम व अटी असतात त्याच सहसा नवीन बँक सुद्धा ठेवते
- जर तुम्ही जुन्या बँकेमध्ये ठेवेदार असाल तर यासाठी सुद्धा आरबीआय ने काही नियम घालून दिलेले आहेत
ठेवीदारांचे पैसे कसे परत मिळतील
- पहिला नियम म्हणजे आरबीआयच्या नियमानुसार तुमचे ठेवी या सुरक्षित राहतील.
- जर बँक बंद पडली तर बँकेची मालमत्तांची विक्री करून तुमची ठेवीदारांचे रक्कम परत केली जाईल.
- ठेवेदारांना रक्कम परत करताना प्राधान्यक्रमानुसार रक्कम परत केली जाईल.
- देवदारांनी आपले सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत.
पुढील कारवाई काय असेल
मित्रांनो जेव्हा पण असे काही बँकांच्या बाबतीत होते तेव्हा तुम्ही बँकेकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवून रहा. तुमच्याकडे असणारे आवश्यक कागदपत्र तयार ठेवा बँकेच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तर तुम्हाला कोणती अडचण आली तर तुम्ही आरबीआय च्या ग्राहक तक्रार केंद्राशी संपर्क साधू शकता.
मित्रांनो भविष्यात असे धोके टाळण्यासाठी तुम्ही आता एकाच बँकेमध्ये मोठी रक्कम न ठेवता विविध बँकांमध्ये रक्कम ठेवू शकता जास्तीत करून तुम्ही सरकारी बँकेमध्ये रक्कम ठेवू शकता. जेव्हा तुम्ही अशा को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये पैसे ठेवतात तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती नक्कीच चेक करत रहा. तुम्ही नेहमीच आपले बँक स्टेटमेंट काढत राहिले पाहिजे आणि तुम्हाला जर काही संसारात पद व्यवहार आढळले तर त्याची तक्रार त्वरित करायला पाहिजे