नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आता नवीन नियम जाहीर

New Sim Card Rule मित्रांनो आजकाल प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आपल्याला पाहायला मिळतो आणि मोबाईलचा जीव ज्याच्या मध्ये बसला आहे तो म्हणजे सिम कार्ड. या सिम कार्ड वरूनच आपल्याला आपला मोबाईल नंबर मिळतो आणि कोणताही व्यक्ती आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आपल्याला फोन लावू शकतो. तर मित्रांनो हे सिम कार्ड घेण्यासाठी आपल्याला विविध कंपन्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

एका माणसांचे नावावर आपण किती सिम कार्ड घेऊ शकतो ? त्यानंतर सिम कार्ड खरेदी करण्यासाठी कोणती प्रोसेस फॉलो करावी लागते आणि सिम कार्ड चा वापर कसा होतो आणि सिमकार्ड चा वापर गैरवापर सुद्धा कसा होतो या सर्व गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

सिम कार्ड चे नवीन नियम  New Sim Card Rule

सिम कार्ड वापरणाऱ्या लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी भारत सरकारने सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आणि त्याच्या वापरण्यासंबंधी नवीन नियम आणले आहेत. या नवीन नियमानुसार नवीन सिम कार्ड खरेदी करणे, त्याची पडताळणी करणे, रिचार्ज करणे किंवा सिम बंद करणे अशा अनेक कारणांसाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

  • नवीन नियमानुसार जेव्हा तुम्ही सिम कार्ड खरेदी करता तेव्हा तुम्हाला ई किंवा स्वीकारणे आता कंपल्सरी करण्यात आलेले आहे.
  • त्यानंतर तुम्ही सिमकार्ड आता अधिकृत डीलर्सकडूनच खरेदी करू शकता.
  • जारी केलेल्या नवीन नियमानुसार आता सिम कार्ड देण्याची प्रक्रिया ही पारदर्शक आणि सुरक्षित होईल.
  • तुम्हाला आता सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक ई केवायसी करावी लागेल.
  • कार्ड खरेदी करण्याआधी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड बायोमेट्रिक पडताळणी करणे हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे.
  • तुमची केवायसी झाल्यानंतर सिम कार्ड कंपन्या सर्व माहिती तपासतील आणि नंतर तुम्हाला सिम कार्ड जारी करतील.
  • जर तुमच्याकडे बनावट डुबलीकेट आयडी आधार कार्ड असेल तर तुम्हाला सिम कार्ड असा घेता येणार नाही.

एका आधार कार्ड वर किती सिम कार्ड  Sim cards on one aadhar card

या आधी एकाच ओळखपत्रावर म्हणजेच एकाच आधार कार्डवर अनेक सिम बाजारातून तुम्ही खरेदी करू शकत होता. आणि या अनलिमिटेड सिम कार्ड मुळे त्याचा गैरवापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत होता. त्यामुळे सरकारने आता एका आधार कार्ड जास्तीत जास्त किती सिम कार्ड घेऊ शकतात ? या संदर्भात नियम आणले आहेत तुम्ही एका आधार कार्डवर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड विकत घेऊ शकतात.

जर तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये सिम कार्ड ची गरज असेल आणि ती खरेदी करायची असेल त्यासाठी वेगळे नियम केंद्र सरकारने बनवले आहेत. बिझनेस साठी सिम कार्ड खरेदी करण्यासाठी तुम्हाला बिझनेसचे कागदपत्रे तिथे जमा करावे लागतील.

सिम कार्ड डीलर्स Sim card dealers 

आता सिम डीलर म्हणून नोंदणी करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. सिम कार्ड विकण्यासाठी तुम्हाला तुमची सरकारकडे नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अनाधिकृत पणे सिमकार्ड विकताना सापडल्यास तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

सरकारने घालून दिलेल्या नवीन नियमानुसार सर्व टेलिफोन कंपन्यांना त्यांच्या डीलर्स डाटा सरकारसोबत शेअर करावा लागणार आहे. या गोष्टीमुळे सरकार सुद्धा आता डीलर्स वर नजर ठेवू शकणार आहे.

एखाद्या सिम कार्ड जर 90 दिवसांसाठी बंद राहिले तर ते ऑटोमॅटिक बंद होईल. आणि तुम्ही 90 दिवसानंतरच नवीन सिम कार्ड बाजारामधून विकत घेऊ शकाल. तुमचा बंद पडलेला क्रमांक दुसऱ्याला देणे अगोदर त्याची व्यवस्थित पडताळणी केली जाईल.

सध्या बाजारामध्ये सिम स्वॅप घोटाळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या घोटाळ्यामध्ये गुन्हेगार दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असणाऱ्या सिम कार्ड मिळवतात. जेव्हा तुम्ही सिम कार्ड स्वॅप करता किंवा पोर्टिंग करता तेव्हा तुम्हाला ओटीपी ची गरज भासणार आहे आणि बायोमेट्रिक पडताळणी सुद्धा करावी लागणार आहे.

बाजारातील टेलिफोन कंपन्यांच्या डीलर्सला 31 मार्च 2025 पर्यंत केवायसी करणे कंपल्सरी करण्यात आलेले आहे. तुम्हाला बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी लागेल असं केल्या नाही असं न केल्यास तुमचा सिम कार्ड विकण्याचा परवाना रद्द करण्यात येईल.

Leave a Comment