Moto G35 5G नमस्कार मित्रांनो बाजारामध्ये सुद्धा मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता प्रत्येक कंपनी ही कमी बजेटमध्ये चांगल्यात चांगला मोबाईल बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या खूप वाढल्यामुळे त्यामध्ये कॉम्पिटिशन वाढली आणि स्वस्त मध्ये भारी मोबाईल देणं ही एक आता स्पर्धा होऊन गेली आहे. मित्रांनो आज आपण मोटरला कंपनीने मार्केटमध्ये आणलेल्या Moto G35 5G या मोबाईल बद्दल माहिती घेणार आहोत. विशेषतः हा मोबाईल 5G टेक्नॉलॉजी वर आधारित असून याची किंमत दहा हजार पेक्षा कमी आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच परवडणाऱ्या अशा किमतीमध्ये हा मोबाईल बाजारात उपलब्ध आहे.
तर याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ.
Design & Build डिझाइन
यामध्ये आपण डिझाईनची जर गोष्ट करायची झाली तर हा मोबाईल स्लिम आणि प्रीमियम डिझाईन या मोबाईल मध्ये देण्यात आलेला आहे. स्लिम आणि प्रीमियम डिझाईन मुळे हा मोबाईल खूप आकर्षक दिसतो. यामध्ये प्लास्टिक बॉडी देण्यात आलेली आहे. खूप मजबूत आणि टिकाऊ आहे. ज्यामुळे तुम्ही दैनंदिन वापर आरामात करू शकता.
या मोबाईल मध्ये तुम्हाला विघन लेदर डिझाईन सुद्धा बघायला मिळेल. या डिझाईनमुळे तो एक खास आणि आधुनिक लुक असा त्याला प्राप्त होतो. यामध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या कलर मध्ये घ्यायचा असेल, तर यामध्ये लिफ ग्रीन, पेरू रेड आणि मिडनाईट ब्लॅक असे तीन कलर उपलब्ध आहेत.
डिस्प्ले Display
या मोबाईलच्या डिस्प्ले बद्दल बोलायचं असल्यास हार्ड डिस्प्ले 6.72 इंच फुल एचडी एल टी पी एस एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या मोबाईलची स्क्रीन ही 2400 * 180 पिक्सल रिझर्वेशन देते. ज्यामध्ये तुम्हाला चांगला अनुभव येतो. या मोबाईलचा रिफ्रेश रेट हा 120 htz एवढा देण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुम्ही सहज रित्या तुम्ही गेम आणि स्कोरिंग करू शकता. त्यानंतर मित्रांनो यामध्ये 240 htz टच सॅम्पलिंग रेट सुद्धा देण्यात आलेला आहे. यामुळे तुम्ही जेव्हा टच करतात तेव्हा लगेच मोबाईल करणार रिस्पॉन्स भेटतो आणि समोरची फाईल ओपन होते.
यामध्ये 1000 नीट चा ब्राईटनेस देण्यात आलेला आहे. यामध्ये या ब्राईटनेसमुळे तुम्ही तळपते उन्हामध्ये सुद्धा मोबाईलवर काम करू शकता. या मोबाईलच्या ग्लासला ग्लोरीला ग्लास थ्री प्रोटेक्शन देण्यात आलेला आहे. त्यामुळे थोडाफार पडणारे पाऊस थेंबा पासून आणि स्क्रीनला ओरखडे जरी पडले तरी आतील स्क्रीन खराब होत नाही.
स्टोरेज Storage
या मोबाईल मध्ये तुम्हाला 8GB आणि 12 GB असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. या मोबाईलची रॅम ही 8GB ते 12 GB पर्यंत तुम्ही वाढू शकता. त्यानंतर मित्रांनो या मोबाईल मध्ये तुम्हाला इंटरनल स्टोरेज हे 128 GB भेटते. हे भरपूर स्टोरेज असल्यामुळे तुम्ही खूप सारे फोटोज काढून व्हिडिओज काढून मोबाईल मध्ये स्टोअर करू शकता.
कॅमेरा Camera
मित्रांनो या मोबाईल मध्ये मागच्या साईडला दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यांना ड्युएल रियल कॅमेरा असे म्हणतात. पहिला कॅमेरा हा 50MP मेगापिक्सल चा देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वाड पिक्सल टेक्नॉलॉजी चा वापर करून फोटो चांगले येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या कॅमेरा हा 8MP मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा अल्ट्राव्हाइड लेंस आहे आणि समोर जो सेल्फी साठी कॅमेरा दिलेला आहे तो 16 मेगापिक्सलचा आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये नाईट मोड सुद्धा देण्यात दिलेला आहे.
Battery बॅटरी
या मोबाईल मध्ये बॅटरी ही 5000 mAh देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभर आरामात या मोबाईलवर टाईमपास गेम आणि इतर कामे करू शकता. या मोबाईल सोबत तुम्हाला 20W वॅटचे फास्ट चार्जर दिले आहे. ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मोबाईल चार्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला यूएसबी टाईप सी चार्जिंग केबल देण्यात आलेले आहे. त्यामुळे डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंग करण्यासाठी हा फोन खूप फास्ट काम करतो.