लाडकी बहीण योजनेतून खालील महिलांना वगळले जाऊ शकते:
- ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आयकर विभागाकडून आलेल्या माहितीनुसार त्यांची पडताळणी होईल.
- ज्या महिला आधीच इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. उदाहरणार्थ, ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना फक्त 500 रुपये मिळतील, जेणेकरून एकूण रक्कम 1500 रुपये होईल.
- ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे. परिवहन विभागाकडून माहिती घेऊन त्यांची पडताळणी केली जाईल.
- ज्या महिलांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँकेतील नाव यामध्ये तफावत आहे, अशा अर्जांची पडताळणी केली जाईल. तसेच केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर आधार ई-केवायसी केली जाईल.
- विवाहानंतर ज्या महिला परराज्यात गेल्या आहेत आणि शासकीय नोकरीत असलेल्या महिलांनी लाभ घेतला असल्यास त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल.