ईरटीका चा खेळ संपला महिंद्रा ने बाजारात आणली 9 सीटर बुलेरो…. किंमत फक्त

Mahindra bolero नमस्कार मित्रांनो गाड्यांच्या व्यवसायामध्ये महिंद्रा कंपनीचे नाव आलं की आपल्याला एक विश्वास निर्माण होतो. महिंद्र कंपनीच्या गाड्या मजबूत, टिकाऊ, कमी मेंटेनन्स देणाऱ्या आणि जास्त मायलेज देणार असतात. महिंद्रा कंपनीच्या काही गाड्या खूपच फेमस आहेत. जसे की बुलेरो, स्कार्पिओ, XUV300 अशा विविध प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये सध्या धिंगाणा घालत आहेत. तर मित्रांनो आज आपण महिंद्रा बोलेरो 9 सीटर या गाडी बद्दल माहिती घेणार आहोत.

Mahindra bolero Features

महिंद्रा बोलेरो ही गाडी बाजारामधील सर्वात मजबूत आणि विश्वासनीय आणि बहुउद्देशीय एक्सयूव्ही म्हणून ओळखले जाते. मोठ्या कुटुंबांसाठी आणि व्यवसायासाठी या गाडीचा जास्त वापर होतो. या गाडीचे असणारे मजबूत इंजिन मजबूत, बॉडी आणि जास्त मायलेज यामुळे ही गाडी ग्रामीण शहरी भागांमध्ये लोकप्रिय बनलेले आहे. महिंद्रा बुलेरो गाडी जास्त करून लांबच्या प्रवासासाठी वापरले जाते. तसेच खराब रस्त्यांवर या गाडी वापरली जाते. गावाखेड्यांमध्ये गाडीला मोठी पसंती आहे. ही गाडी कमी पैशांमध्ये येते तिचा टिकाऊ पणा जास्त आहे. बॉडी मजबूत आहे, त्यामुळे मोठ्या कुटुंबांसाठी आणि व्यवसायांसाठी ही गाडी खूप फेमस आहे.

या गाडीमध्ये तुम्हाला पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. यामुळे तुम्ही गाडी व्यवस्थित चालू शकता आणि इंधन सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते. कंपनीने या गाडीमध्ये रियल फील ड्राईव्ह ही सिस्टीम सुद्धा देण्यात आलेली आहे. खराब रस्ते ओबडधोबड मार्ग यांसाठी मजबूत सस्पेन्शन सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये समोरच्या साईडला दोन एअरबॅक देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये एबीएस अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा देण्यात आलेला आहे. गाडी पार्क करताना कुठे धडकून नये, म्हणून मागच्या साईडला पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेले आहेत.

डिझाईन Mahindra bolero design

या गाडीचे डिझाईन असे बनवले आहे की ती खराब रस्त्यांवरही एकदम व्यवस्थित प्रकारे चालू शकते. या गाडीमध्ये तुम्हाला मस्क्युलर फ्रंट विल देण्यात आलेला आहे. या ग्रील मुळे गाडीचा लुक अधिक आकर्षक बनतो. या गाडीला कोणते परिस्थितीतून चालवण्यासाठी मोठा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे. हा ग्राउंड क्लिअरन्स 180 मिलिमीटर ते 195 मिलीमीटर एवढा आहे.

मोठा ग्राउंड क्लिअर्स असल्याने तुम्ही कोणत्याही रस्त्यावरून हिला चालू शकता. कंपनीतर्फे या गाडीला हॅलोजन लाइट्स, एलईडी डीआरएल देण्यात आलेला आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना या हेडलाईटचा उजेड जास्त पडतो. या गाडीमध्ये स्टील व्हील देण्यात आलेले आहेत. मजबूत टायर आहेत.

इंटेरियर डिझाईन Interior Design

या गाडीमध्ये आतील बसण्याची व्यवस्था खूपच आरामदायी केलेली आहे. या गाडीमध्ये तुम्ही समोरच्या साईडला दोन माणसे, मधल्या साईडला तीन माणसे, आणि शेवटच्या साईडला मागच्या साईडला चार माणसे असे नऊ जणांची आसन क्षमता देण्यात आलेली आहे. कंपनीतर्फे या गाडीमध्ये तुम्हाला प्रीमियम कॉलिटी चे फॅब्रिक सीट्स मिळतात जेणेकरून तुम्हाला आरामदायी प्रवास करता येतो.

महिंद्र कंपनीने या गाडीमध्ये पॉवर स्टेरिंग आणि डिजिटल डॅशबोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे. या डॅशबोर्ड वर तुम्हाला फ्युएल इंडिकेटर त्यानंतर टायरमध्ये किती हवा आहे या सर्व गोष्टींची माहिती मिळते. गाडीची स्पीड सुद्धा कळते. ही गाडी मोठी असल्याने याच्यामध्ये डिक्की म्हणजेच बूट स्पेस पण खूप मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये समोरच्या साईडला आणि मधल्या साईडला एसी देण्यात आलेला आहे.

Mahindra bolero mileage

या गाडीमध्ये तुम्हाला सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीम सुद्धा देण्यात आलेले आहे एका 80 च्या वर स्पीड गेल्यानंतर तुम्हाला गाडी वार्निंग देते आणि सील बेड लावल्या नाही तर गाडी सुरू सुद्धा होत नाही.

या गाडीचे मायलेज शहरी भागांमध्ये पंधरा ते सोळा किलोमीटर प्रतिलिटर एवढे आहे. आणि जर एक्सप्रेस रस्त्यावर असेल तर हीच गाडी 17 ते 18 किलोमीटर प्रति लिटर एवढा एव्हरेज देते. कंपनीने या गाडीमध्ये 60 लिटरची फ्युएल टॅंक देण्यात आलेले आहे. जेणेकरून तुम्ही लांबचा प्रवास वारंवार इंधन न भरता करू शकता.

किंमत Mahindra bolero Price

बेस व्हेरिएंट (B4) – ₹ १० लाख
मध्यम प्रकार (B6) – ₹ ११ लाख
टॉप व्हेरिएंट (B6 ऑप्ट) – ₹ १२ लाख
(स्थान आणि डीलरशिपनुसार किमती बदलू शकतात.)

Leave a Comment