Kamgar Peti Yojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काही विशेष योजना राबवलेल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील कामगार लोकांना सुरक्षितता प्रधान व्हावी आणि त्यांच्या आर्थिक स्तर उंच व्हावे यासाठी राज्य शासन केंद्र शासन नेहमीच प्रयत्नशील असतं. अशाच प्रयत्नांमधून महाराष्ट्र राज्य शासनाने आता बांधकाम कामगार पेटी योजना 2025 हे चालू केलेले आहे. ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे चालवली जाते. या योजनेचा फायदा केवळ बांधकाम क्षेत्रातील कामगारच घेऊ शकतात.
बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना कामगारांच्या जीवाला धोका असतो. उंच उंच बिल्डिंग वर काम करताना खाली पडण्याचा धोका असतो. घसरून लागण्याचं धोका असतो. जिथे सतत वापरत होणाऱ्या लोखंडाच्या सळ्यांचा धोका असतो. अशा वेळेस काही अपघात झाल्यास त्यांना खूप मोठे आर्थिक अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा काही अडचणी तयार होऊ नाहीत, म्हणून राज्य शासनाने प्रयत्नशील असतं.
यामुळे त्यांना सुरक्षा साधने टायमावर देणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक कामगारांपर्यंत पोहोचणे सुद्धा महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामगार हा सुरक्षा साधने विकत घेऊ शकत नाही त्यामुळे या समस्येवर उत्तर म्हणून कामगारांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरते.
या पेटीमध्ये तुम्हाला काय काय मिळते
सर्वप्रथम या पी टी मध्ये तुम्हाला दर्जेदार सुरक्षा हेल्मेट दिलेल्या असतं. त्यानंतर विशेष सुरक्षा जॅकेट या पेटीमध्ये असतो. त्यानंतर मजबूत सेफ्टी शूज, सोलार टॉर्च, आणि चार्जर, दस्ताने, रस्ताने चार डब्यांचा लंच बॉक्स, पाण्याची बॉटल, मच्छरदाणी, चटई, स्टील बॉक्स आणि बॅग असे साधने या पेटीमध्ये दिलेले असतात.
5000 रुपयांची आर्थिक
कामगारांना योजनेअंतर्गत विशेष आर्थिक लाभ सुद्धा दिला जातो यामध्ये लाभार्थ्याला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आर्थिक मदत मिळवण्यासाठी काही नियम दिलेले आहेत.
- पाच हजार रुपयांच्या पात्रतेसाठी तुमची वयोमर्यादा ही 18 ते 60 वर्षे असली पाहिजे.
- त्यानंतर तुमचे कायमस्वरूपी निवास हे महाराष्ट्र राज्याचे असले पाहिजे.
- त्यानंतर कामाचा अनुभव हा मागील बारा महिन्यात किमान आपण 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
- त्यानंतर तुमच्याकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुमची नोंदणी झालेली पाहिजे.
- तुमचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखांपेक्षा कमी पाहिजे तेव्हाच आपण या पाच हजार रुपयांचा लाभ घेऊ शकता.
या पाच हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात ती म्हणजे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र, वयाचा प्रमाणपत्र, त्यानंतर ओळखपत्र आणि नव्वद दिवस काम केलेले प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर.
अर्ज How to register
या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे असल्यास तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय किंवा तालुकास्तरावरील काम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या कडून अर्ज घ्यावा लागेल. त्यानंतर अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे भरावी लागेल. त्यानंतर अर्ज सोबत लागणारी कागदपत्रे तुम्हाला तिथे द्यावी लागेल आणि अर्ज ऑफिसमध्ये देऊन अर्जाची पावती घ्यावी लागेल.
जर तुम्हाला अर्ज करताना अडचण येत असेल, तर तुम्ही गावातील ग्रामपंचायत कार्यालय गावातील सेतू केंद्र किंवा सीएससी केंद्र यावर जाऊन फॉर्म घेऊ शकता. तिथे पाहिजे ते आवश्यक माहिती भरून तुमच्या कागदपत्राची अपलोड करून सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित कार्यालयामध्ये जमा करू शकता.
जेव्हा तुम्ही अर्ज करताल तेव्हा अर्ज दिलेले माहिती सगळी खरी असायला पाहिजे. त्यानंतर कागदपत्रे स्पष्ट असली पाहिजेत. त्यानंतर जोडलेला कागदपत्र तुमची सही असली पाहिजे. तुमचा मोबाईल क्रमांक हा आधार कार्डशी लिंक असलेला पाहिजे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.