जिओनी बाजारात आणला सर्वात स्वस्त प्लॅन आता मिळणार अनलिमिटेड डेटा

Jio unlimited data plan नमस्कार मित्रांनो जिओ कंपनी ग्राहकांना परवडणारे प्लॅन हे नेहमीच आणत असते. जिओ कंपनीने काही वर्षांपूर्वी सर्वांना 4G डेटा फ्री दिला आणि इंटरनेटच्या जगतामध्ये एक नवीनच क्रांती घडवून आणली. इंटरनेट साठी लोकांना खूप सारे पैसे खर्च करावे लागायचे. महिन्याभरामध्ये एक जीबी डाटा म्हणजे खूप असायचा. परंतु जिओनी केलेल्या क्रांतीने दिवसभरामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डाटा मिळाला. आणि हा डाटा एक नव्हे तर दोन ते तीन वर्षे त्यांनी लोकांना पुरवला.

या पुरवल्या गेलेल्या फ्री डाटा त्यामुळे भारतामध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या सुरू झाल्या. लोकांना रोजगार मिळाले.इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला इंटरनेटचा वापर वाढल्याने युट्युब वर व्हिडिओ बनवणारे लोकांची संख्या वाढली. Instagram वाढणाऱ्या लोकांची संख्या वाढली. फेसबुक असे विविध सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांची संख्या वाढली. आणि या सोशल मीडियाद्वारे पैसे कमवणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात झाली.

जिओचा नवीन प्लॅन Jio’s new plan

तर मित्रांनो जिओनी सध्या मार्केटमध्ये एक नवीन प्लॅन आणलेला आहे. या प्लॅन बद्दल माहिती घेऊ. ग्राहकांसाठी फक्त 175 मध्ये हा प्लॅन आणलेला आहे. या प्लॅनमध्ये काय काय दिलेले आहे ते पाहूया. रुपये 175 च्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग पुरेसा हाय स्पीड डेटा आणि एसेमेस ची सुविधा देण्यात आलेली आहे.

या प्लॅन नुसार तुम्ही देशभरातील कोणत्याही कार्डवर नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. त्यानंतर तुम्हाला 28 दिवसांसाठी इंटरनेटचा डेटा सुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्हाला यामध्ये दहा जीबी डेटा हा तुम्हाला महिनाभरासाठी दिलेला आहे. हा संपल्यानंतर तुमची इंटरनेट 64 केबीपीएस च्या स्पीडने चालेल.

या प्लॅन नुसार तुम्हाला दररोज शंभर एसेमेस फ्री देण्यात आलेले आहेत. या प्लॅनची विशेषता म्हणजे जिओच्या डिजिटल सुविधांचा वापर तुम्हाला येते मोफत मिळतो. जसे की जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड यासारख्या ॲप्स तुम्ही वापर मोफत करू शकता. मित्रांनो हा प्लॅन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्यानंतर प्रोजेक्टवर मनोरंजनासाठी तुम्ही वापरू शकता.

हा प्लॅन कुणासाठी फायद्याचा

दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुम्हाला हा प्लॅन परवडणारा आहे यामध्ये तुम्ही जिओ टीव्ही जिओ सिनेमा पाहू शकता आणि अनलिमिटेड कॉलिंग असल्याने तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी कॉल करून पाहिजे तेवढे बोलू शकता. ज्या लोकांना कमी खर्चामध्ये एक महिने प्लॅन पाहिजे असेल, त्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. त्यामध्ये तुम्हाला कॉलिंग इंटरनेट आणि तुमचा टाईमपास होण्यासाठी मनोरंजनाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे.

जिओचे इतर प्लॅन Other plans of Jio

  • मित्रांनो जिओ कंपनीने इतर सुद्धा प्लॅन बाजारामध्ये आणलेले आहेत. जसे की जर तुम्ही 186 रुपयाचा प्लान विकत घेतला तर तुम्हाला दररोज एक जीबी डेटा दिला जाईल हार्ड प्लॅन 28 दिवसांसाठी वैद असेल.
  • जिओचा दुसरा प्लॅन म्हणजे 249 रुपयांचा या प्लॅन नुसार तुम्हाला दररोज दीड जीबी डेटा दिला जाईल आणि याची मर्यादा सुद्धा 28 दिवसांचीच आहे.

रिचार्ज कसे करायचे How to recharge

या प्लॅन साठी जर तुम्हाला ऑनलाईन रिचार्ज करायचे असेल तर तुम्ही माय जिओ ॲप मध्ये जाऊन सुद्धा रिचार्ज करू शकता. यासाठी तुम्हाला जिओचा मोबाईल क्रमांक टाकून अकाउंट ओपन करावे लागेल. मोबाईलवर तुमच्या ओटीपी येईल आणि तुमच्या अकाउंट तयार होईल. तसेच तुम्ही यूपीआय पेमेंट द्वारे सुद्धा रिचार्ज करू शकता. जसे की फोन पे, गुगल पे इतर सर्व प्लॅटफॉर्मवरून तुम्ही आता रिचार्ज करू शकता.

या प्लॅन नुसार तुम्हाला जिओ टीव्ही जिओ सिनेमा फ्री मध्ये मिळतो आणि जिओ टीव्ही मध्ये शंभर पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल तुम्हाला पाहायला मिळतात त्यानंतर जिओ सिनेमा या ॲपचे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला नवनवीन चित्रपट वेब सिरीज पाहायला मिळतात तसेच जिओ क्लाऊडच्या माध्यमातून तुम्ही तुमचा महत्त्वाचा डाटा क्लाऊडवर सेव्ह करून ठेवू शकता

Leave a Comment