HSRP Number Plate नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे गाड्यांच्या संदर्भात नेहमीच विविध निर्णय घेत असत. अधिका अधिक चांगले निर्णय घेऊन परिवार कसे सुरक्षित आणि सक्षम होईल या संदर्भात प्रयत्न करत असतं. असाच एक निर्णय परिवहन मंडळांनी घेतलेला आहे. तो म्हणजे आता सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP लावणे हे कंपल्सरी करण्यात आले आहे.
या नवीन जारी केलेल्या नियमानुसार आता तुम्हाला 31 मार्च 2025 पर्यंत सर्व जुन्या गाड्यांवर ही नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. आपल्याला तर माहीतच आहे की वाहनांची चोरी मोठ्या प्रमाणात होते. नंबर प्लेट काढून टाकली जाते आणि नवीन नंबर प्लेट लावून गाड्या चालवल्या जातात. अशा चोरी रोखण्यासाठी आणि वाहनांची सुरक्षितता वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या तारखेपासून नवीन नियम लागू होणार
HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ह्या एप्रिल 1 एप्रिल 2019 पासून राज्यांमध्ये लावण्यात आलेल्या होत्या. या नवीन प्रकारच्या प्लेट राज्य सरकारने चालू केलेल्या होत्या. परंतु एक एप्रिल 2019 पूर्वीच्या गाड्या ज्या मार्केटमध्ये आल्या आणि लोकांनी विकत घेतल्या त्या गाड्यांना ह्या नंबर प्लेट नाहीत. त्यामुळे आता एक एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व गाड्यांना ह्या नंबर प्लेट लावणे कंपल्सरी केलेले आहे. जर कुणी नंबर प्लेट लावली नाही आणि नियमाचे उल्लंघन केल्यास अशा गाडी चालकांवर आरटीओ तर्फे मोठी कारवाई करण्यात येणार आहे.
HSRP नंबर प्लेट वैशिष्ट्ये
जी नवीन एच एस आर पी HSRP नंबर प्लेट बनवण्यात आलेले आहे या नंबर प्लेट मध्ये काही अत्याधुनिक आणि सुरक्षित असे फीचर्स देण्यात आलेले आहेत काय काय आहेत ते पाहू.
- या नंबर प्लेटमध्ये तुम्हाला क्रोमियम आधारित होलोग्राम देण्यात आलेला आहे.
- त्यानंतर लेझरने कोरलेला युनिकोड सुद्धा यामध्ये बसवण्यात आलेला आहे.
- या नंबर प्लेटमध्ये अल्ट्राव्हायोलेट मार्किंग सुद्धा देण्यात आलेली आहे.
- त्यानंतर या नंबर प्लेटमध्ये नॉन रिमुव्हेबल स्नॅप लॉक सुद्धा देण्यात आलेले आहे.
- यामध्ये तुम्हाला नंबर प्लेटवर मायक्रोची टॅक्स सुद्धा बसवण्यात आलेला आहे.
- इंडियन ट्रिकल स्टिकर सुद्धा यामध्ये बसवण्यात आलेले आहेत.
HSRP प्लेट चे नवीन दर
जेव्हा तुम्ही बाजारामधून ही नंबर प्लेट विकत घेणार असाल तर या नंबर प्लेटचे दर सुद्धा परिवहन मंडळातर्फे जारी करण्यात आलेले आहेत.
- जर तुमच्याकडे मोटरसायकल आणि ट्रॅक्टर असेल तर यामध्ये तुम्ही 450 रुपये प्लस जीएसटी भरून नंबर प्लेट बाजारामधून विकत घेऊ शकता.
- त्यानंतर तीन चाकी वाहन असेल तर तुम्ही पाचशे रुपये प्लस जीएसटी भरून ही नंबर प्लेट विकत घेऊ शकता.
- तसेच चार चाकी आणि इतर मोठ्या गाड्यांसाठी तुम्हाला 725 रुपये प्लस जीएसटी भरून नंबर प्लेट विकत घ्यावी लागेल.
नवीन नंबर प्लेट साठी अर्ज
ही नंबर प्लेट तुम्ही कशाप्रकारे आणि कुठून घेऊ शकता या संदर्भात माहिती सुद्धा दिलेले आहेत. तर तुम्हाला मास्टर परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तुम्हाला तिथे पैसे भरावे लागतील .तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या आरटीओ वर जाऊन नंबर प्लेट घ्यावे लागेल.
कागदपत्रे
नंबर प्लेट घेण्यासाठी तुम्हाला वाहनांची कोणती कागदपत्रे लागणार आहेत. या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आलेले आहेत.
- पहिला म्हणजे तुम्हाला वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी बुक लागणार आहे.
- त्यानंतर गाडीचा विमा पॉलिसी पावती लागणार आहे.
- त्यानंतर गाडीचा केलेला वैध पियूसी सुद्धा लागणार आहे.
- त्यानंतर गाडी मालकाचे ओळखपत्र लागणार आहे
- पॅन कार्ड
HSRP नंबर प्लेट चे फायदे
ही नंबर प्लेट बाजारात आल्याने वाहन चालकांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. पहिला फायदा म्हणजे तुमची गाडी चोरी होण्यापासून रोखण्यासाठी याची मदत होईल. त्यानंतर बनावट नंबर प्लेटचा वापर मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे. या नंबर प्लेटमध्ये तुमची गाडी सहज ट्रॅक करता येईल गाडीची सुरक्षितता वाढेल आणि गाडी संदर्भात डिजिटल रेकॉर्ड ठेवणे सुद्धा सोपे होईल.
त्यामुळे सर्व गाडी चालकांना विनंती आहे की 31 मार्चपर्यंत तुम्ही तुमच्या गाडीची नवीन नंबर प्लेट बसून घ्या नाहीतर तुम्हाला आरटीओ तर्फे मोठी कारवाई होईल आणि मोठा दंडा आकारला जाईल.