फक्त 64 हजार रुपयांमध्ये मिळणार होंडा शाइन

Honda shine 100 मित्रांनो आजकालच्या जगामध्ये मोटरसायकल विकत घेणे आणि मोटरसायकल घरी असणं म्हणजे खूपच नॉर्मल गोष्ट झालेली आहे. मध्यमवर्गीयांसाठी मोटरसायकल म्हणले की सगळ्यात आधी डोक्यात येते गाडी ती म्हणजे होंडा शाईन. याच होंडा शाइन ने आता मार्केटमध्ये एक स्वस्त मॉडेल लॉन्च केलेला आहे ते म्हणजे होंडा शाइन 100. तर मित्रांनो आज आपण या गाडी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

डिझाईन आणि स्टाईल Design & Style

होंडा कंपनीने ही गाडी बनवताना ह्या गाडीला खूप साधी लुक आहे आणि खूप आकर्षक वाटते त्यानंतर हिचा लुक एक क्लासिक अपिल देतो. पेट्रोलच्या टाकीवर आणि साईडला ग्राफिक्स देण्यात आलेले आहेत. जेणेकरून ही गाडी खूप अट्रॅक्टीव्ह वाटते. या गाडीमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी लांबलचक सीट देण्यात आलेले आहे आणि गादी सुद्धा खूप आरामदाय आहे. जेव्हा तुम्ही प्रवास करतात तेव्हा तुम्हाला आरामदायी अनुभव येतो. या गाडीचे वजन खूप हलके आहे. ज्यामुळे ही गाडी ट्रॅफिक मध्ये चालवणे सुद्धा खूप सोपे जाते.

इंजिन आणि परफॉर्मन्स Engine & Performance

या गाडीमध्ये तुम्हाला 100cc इंजिन देण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला एअर कुल्ड फोर स्ट्रोक इंजिन सुद्धा देण्यात आलेले आहेत. हे इंजिन 7.6 बीएचपी पावरच्या असून 7500 आरपीएम एवढा जनरेट करतात. या गाडीमध्ये तुम्हाला 5000 rpm टॉर्क सुद्धा देण्यात आलेला आहे.

या गाडीचे इंजिन खूप दमदार असून तुम्हाला एक सॉफ्ट अनुभव देते आणि लांबच्या प्रवासासाठी खूपच आनंदही देते. त्यानंतर मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला फोर स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे. हा गिअर बॉक्स मॅन्युअल आहे आणि यामुळे तुम्हाला पाहिजे तसे गेअर चेंज करून स्पीड कमी जास्त करता येते. या गाडीमध्ये गाडी चालवताना तुम्हाला व्हायब्रेशन कमी जाणवते यामध्ये विशेष अशी टेक्नॉलॉजी वापरून व्हायब्रेशन कमी करण्यात आलेले आहे.

माइलेज Mileage

या गाडीचे मायलेज जर आपण पाहिले तर 70 ते 75 किलोमीटर प्रति लिटर एवढे देण्यात आलेले आहे. होंडा कंपनीने तयार केलेले तंत्रज्ञान म्हणजे ऍडव्हान्स मार्ट पावर हे यामध्ये वापरलेले आहे. जेणेकरून गाडी तुम्हाला जास्त मायलेज देते. ही गाडी विशेषता मध्यमवर्ग्यांसाठी बनवलेले आहे जेणेकरून कमी पेट्रोल खर्चामध्ये जास्त प्रवास करता येईल.

ब्रेकिंग सिस्टम Braking System

या गाडीची ब्रेकिंग सिस्टीम पाहताना तुम्हाला मागील आणि पुढील सारखे ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये तुम्हाला 130 मिलिमीटर ड्रम ब्रेक्स देण्यात आलेले आहेत. हे ब्रेक्स दररोजच्या वापरासाठी पुरेसे आहेत. या गाडीमध्ये जर तुम्ही हायर मॉडेल विकत घेतले तर तुम्हाला डिस्क ब्रेक चा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. या गाडीमध्ये कॉम्बि ब्रेकिंग सिस्टीम वापरण्यात आलेले आहे. जेणेकरून तुम्हाला अचानक आलेल्या धोक्यापासून गाडी थांबवता येते आणि अपघाताची शक्यता कमी होते. या गाडीचे ब्रेकिंग सिस्टीम शहरात आणि महामार्गावर सुरक्षितपणे गाडी चालवण्यासाठी बनवलेले आहेत.

सस्पेंशन आणि  हैंडलिंग Suspension & Handling

या गाडीमध्ये सस्पेन्शन हे टेलिस्कोपिक फर्क हे देण्यात आलेले आहे. तुम्ही किती खराब रस्त्यांवर गाडी आरामात चालू शकता या गाडीचे मागील सस्पेन्शन हे स्विंग आम सस्पेन्शन असे देण्यात आलेले आहे. दोन शॉक सुद्धा मागच्या साईडला देण्यात आलेले आहेत. या गाडीचे वजन कमी असल्याने तुम्ही या गाडीला सहजपणे हातळू शकता आणि कमी जागेच्या रस्त्यामधूनही तुम्ही गाडी व्यवस्थित चालू शकता.

Features

या गाडीची पकड ही रस्त्यांवर चांगली आहे टायर यांना व्यवस्थित ग्रुप सुद्धा देण्यात आलेली आहे. या गाडीच्या समोरच्या साईडला तुम्हाला स्पीडोमीटर ट्रिप मीटर आणि इंजन गेज या तिन्ही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. या गाडीमध्ये तुम्ही बटन स्टार्ट किंवा किक मारून गाडी चालू करणे हे दोन्ही पर्याय देण्यात आलेले आहेत. या गाडीला तुम्ही जास्तीत जास्त 90 ते 95 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने पळू शकता या गाडीचे मेंटेनन्स कमी आहे. त्यामुळे ही गाडी अधिक परवडते.

किंमत Price 

शोरूममधील किंमत – ₹ ६४,९०० (शहरानुसार बदलू शकते).
ऑन-रोड किंमत – ₹ ७७,३१६ (आरटीओ आणि विमा समाविष्ट).
ईएमआय पर्याय – ₹२,२२६ प्रति महिना (वित्त सुविधा उपलब्ध).

ही गाडी भारतातील प्रमुख शहरांच्या शोरूम मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता.

Leave a Comment