Goat Farming 2025 राज्य सरकारने 2024 मध्ये गाय-गोठा अनुदान योजना सुरू केली आहे. ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना
असून यातून शेतकऱ्यांना त्यांच्या गाई-म्हशीसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते.
अमरावती : ग्रामीण भागात जास्तीत जास्त पशुपालन व्यवसाय केला जातो. पण, जनावरांना राहण्यासाठी व्यवस्थित जागा राहत
नाही. त्यामुळे त्यांना काही वेळा इजा पोहचण्याची शक्यता असते. पशुंना इजा पोहचू नये आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, हाच विचार करून राज्य सरकारने 2024 मध्ये गाय-गोठा अनुदान योजना सुरू केली आहे. ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना असून यातून शेतकऱ्यांना त्यांच्या गाई-म्हशीसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक
साहाय्य दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होते.
काय आहे ही योजना?
गाय-गोठा अनुदान योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गोठा बांधणीसाठी आणि त्याचबरोबर पशुपालन व्यवस्थित व स्वच्छ ठेवण्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. ही मदत शेतकऱ्यांना अनुदान म्हणून पैशाच्या स्वरूपात केली जाते. म्हणजेच गोठा बांधणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग शासनाकडून अनुदान स्वरूपात सरकारकडून पशुपालकांना दिला जातो.
अनुदान किती मिळते?
या योजनेसाठी पशुंच्या संख्येवरून वेगवेगळे अनुदान दिले जाते.
1. 2 ते 6 जनावरांच्या गोठा उभारणीसाठी रुपये 77 हजार 188 इतके अनुदान शासनाकडून दिले जाते.
2. 6 ते 12 जनावरांचा गोठा उभारण्यासाठी दुप्पट अनुदान म्हणजेच 1 लाख 54 हजार 376 रुपये इतके अनुदान दिले जाते.
3. 13 पेक्षा जास्त जनावरांसाठी पहिल्या अनुदानाच्या 3 पट म्हणजेच 2 लाख 31 हजार रुपये इतके अनुदान दिले जाते.