Free sewing machines नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे, केंद्र सरकार नेहमीच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध निर्णय घेत असते. त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. याच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन. मित्रांनो या योजना सुरू करण्यामागे केंद्र सरकारचा मुख्य हेतू असा की महिलांना घरी बसून रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यांना मिळणाऱ्या आर्थिक फायद्यातून त्यांच्या घरगुती खर्चासाठी मदत होईल.
ही योजना सध्या खूप लोकप्रिय असून भारतातील 18 विभागांमध्ये ही सक्रिय केलेली आहे. मोफत शिलाई मशीन ही योजना सुरू करण्यामागे केंद्र सरकारचा उद्देश म्हणजे महिलांना घरच्या घरी बसून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि घराला सुद्धा आर्थिक मदत लागेल.
या योजनेअंतर्गत महिलांना शिवणकाम करण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून महिला उत्तम प्रकारे शिवणकाम करू शकतील. शिवणकाम हे प्रकारचे कौशल्यच आहे. ज्याला आजकालच्या भाषेमध्ये स्किल असे म्हणतात. हे शिवणकाम शिकल्याने महिला कुठेही बसून त्यांचा त्या स्वतः रोजगार निर्माण करू शकतात.
शिलाई मशीन मुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि त्या कोणावरही अवलंबून राहणार नाहीत. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी पीएम विश्वकर्मा ही योजना संपूर्ण भारतामध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजना सुद्धा होती आणि या योजनेअंतर्गतच शिलाई मशीन योजना चालवली जाणार आहे. पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यामागे केंद्र सरकारचा हेतू म्हणजे पारंपारिक असलेल्या उद्योगधंदांना चालना देणे आणि अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन कारागिरांना सक्षम बनवणे.
मित्रांनो शिलाई मशीन योजना सुरू केल्याने महिलांना खूप प्रकारचे फायदे होणार आहेत. पहिला फायदा म्हणजे घरातूनच रोजगार महिलांना मिळेल. त्यांना कुठेही बाहेर जाऊन काम करण्याची आवश्यकता नाही. या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई काम कसे करायचे या संदर्भात प्रशिक्षण मिळणार आहे. मिळालेल्या प्रशिक्षणातून महिला आर्थिक दृष्टी स्वावलंबी बनतील. या योजनेअंतर्गत महिलांना 10 दिवसाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा अनुदान दिले जाणार आहे. महिलांना शिलाई मशीन काम आल्याने त्यांना आर्थिक मदत होईल आणि मिळणाऱ्या पैशांमधून त्यांच्या घराची परिस्थिती सुधारेल.
शिलाई मशीन पात्रता
या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील या संदर्भात केंद्र सरकारने काही नियमवली जाहीर केलेली आहे.
- पहिला नियम म्हणजे अर्जदार महिला ही भारताची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- त्यानंतर मित्रांनो महिलांचे वय इथे 18 ते 40 वर्ष ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- महिला या आर्थिक दुर्बल घटकातील असणे आवश्यक आहे.
- महिलांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना स्वतःचे बँक खाते उघडावे लागणार आहे
- तसेच या योजनेसाठी लागत असणारे सर्व कागदपत्रे महिलांकडे असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
मित्रांनो या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल.
- पहिला कागदपत्र म्हणजे आधार कार्ड हा तुम्हाला सरकारी ओळखपत्र म्हणून लागेल.
- त्यानंतर मित्रांनो आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा येथे द्यावे लागणार आहे.
- बँकेमध्ये अकाउंट उघडल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे बँक पासबुकचा सुद्धा लागेल.
- तुम्ही कोणत्या ठिकाणाहून काम करणार आहात म्हणून तुमचं पत्त्याचा पुरावा सुद्धा येथील ग्राह्य धरला जाईल. पण त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड वीज बिल पाणी बिल इत्यादी गोष्टी देऊ शकतात.
- मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. येथे महिलांचे जात प्रमाणपत्र मागितले जाईल
- जर तुम्ही दारिद्र रेषेखालील असाल तर तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
- त्यानंतर मित्रांनो उत्पन्नाचा पुरावा सुद्धा लागणार आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी आहे हे सिद्ध करायचे आहे.
- त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज आकाराचा फोटो सुद्धा लागेल.
- त्यानंतर महिला अर्जदार महिलांची स्वाक्षरी सुद्धा लागणार आहे