Farmer id नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. आणि या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध यंत्रणांची व्यवस्था सरकार करत असतं. अशाच प्रकारे केंद्र सरकारने आता फार्मर आयडी नावाने एक शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र आणलेल आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आता हे ओळखपत्र काढणे गरजेचे आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला ओळख पटवून देण्यासाठी हे ओळखपत्र कामाला येणार आहे.
संपूर्ण देशभरामध्ये आता ओळखपत्र काढण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. हे नवीन फार्मर आयडी तुमच्या आधार कार्ड ला जोडलेले असेल आणि या मध्ये तुम्हाला 11 अंकी तुमचा नंबर पाहायला मिळेल. तुम्हाला राज्य सरकार तर्फे केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ या कार्डद्वारे घेता येणार आहे. हे फार्मर आयडी बनवताना तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबतच तुमची जमिनीची कागदपत्र सुद्धा जोडावे लागतात. आता काही शेतकऱ्यांच्या जमीन कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळत आहेत अशा त्रुटी तुम्हाला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत बरोबर करून घ्यायचे आहेत.
फार्मर आयडी म्हणजे काय ?
भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने चालू केलेली आहे की योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या कार्डमध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीसंबंधीची माहिती आणि शेतामध्ये कोणते पीक लावले आहे. या सर्व गोष्टींची माहिती आता या कार्डमध्ये मिळणार आहे. हे कार्ड काढताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्याला जोडणे हे अत्यावश्यक आहे.
हे कार्ड काढल्याने आता शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज नाही. ह्या कार्डद्वारे आता सर्व शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन द्वारे उपलब्ध होईल आणि त्यांना लाभ घेण्यासाठी फायदेशीर ठरेल.मित्रांनो कोणतीही योजना किंवा कार्यक्रम राबवताना त्यामध्ये काही ना काही तरी अडचणी येतच असतात. या फार्मर आयडी बनवताना सुद्धा काही अडचणी शेतकऱ्यांना आलेल्या आहेत.
काही शेतकऱ्यांच्या नावे चुकीची क्षेत्रफळ दाखवण्यात आले, म्हणजे जमीन कमी दाखवणे किंवा जास्त दाखवणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सध्या समोर येत आहेत. जमीन कमी किंवा जास्त दाखवल्याने त्यांना पाहिजे त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे यावर काहीतरी उत्तर म्हणून आता सरकार नवीन प्रयत्न करत आहे.
कार्डमध्ये जमिनीची क्षेत्रफळाची जर त्रुटी आली असल्यास त्यासाठी काय करावे ?
- यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जावे लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला दुरुस्ती अर्ज दाखल करावा लागेल.
- यामध्ये तुम्हाला कागदपत्रे काही द्यावी लागतील. त्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीची मालकी हक्क असेल असे पुरावे, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, सातबारा, फेरफार नोंद अशी विविध कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागतील.
- किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. महाभुलेख डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज दाखल करू शकता.
- अर्ज दाखल केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये तहसील कार्यालयाकडून तलाठी किंवा मंडळ अधिकारी येऊन तुमच्या जमिनीची पाहणी करतील आणि दुरुस्ती केली जाईल.
फार्मर आयडीमुळे मिळणारे फायदे
हे कार्ड बनवल्यानंतर सरकारने चालू केलेल्या शेतकऱ्यांसाठी योजनांचा फायदा मिळेल. जसे की पी एम किसान सन्माननिधी योजना त्यानंतर नमो शेतकरी सन्माननिधी योजना. जो शेतकरी दर वर्षी पिक विमा भरतो याचा लाभ अशा विविध प्रकारच्या योजनांचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.
या कार्डद्वारे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी सुद्धा मदत होईल. त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ती ट्रान्सफर केली जाईल. तसेच बाजारामध्ये पीक विक्रीसाठी सुद्धा मदत होईल.
तुम्ही जेव्हा हे कार्ड काढाल तेव्हा तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळणे सुद्धा सोयीचे होऊन जाईल. या किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून तुम्ही पीक कर्ज हे स्वस्त व्याजदरामध्ये घेऊ शकता.
तसेच राज्य सरकार किंवा केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या स्वस्त दरामध्ये खते बियाणे कीटकनाशके यांचा सुद्धा तुम्ही या कार्डद्वारे लाभ घेऊ शकता.
शेतकऱ्यांना ऑनलाइन पीक विक्री विक्री करण्यासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या इ-नाम या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही विक्री करू शकता.