Edible oil prices माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. स्वयंपाक घरांमध्ये याचा वापर केला जातो. सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत खाद्यतेलाच वापर हा प्रत्येक गोष्टीमध्ये होतो. सध्या बाजारामध्ये खाद्यतेलांच्या किमती प्रचंड वाढत आहेत. यामुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.
गेल्या काही तीन महिन्यांमध्ये सोयाबीन सूर्यफूल शेंगदाणा या तेलांच्या किमतींमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ झाली. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये होणारी वाढ ही मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप त्रासदायक आहे. तेल हा जेवण बनवताना एक अविभाज्य घटक मानला जातो. यामुळे तेलाच्या विना स्वयंपाक शक्य होत नाही. तर मित्रांनो सध्या वाढत असले खाद्य तेलाचे दर आणि जागतिक बाजारपेठ याबद्दल आपण माहिती घेऊ
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जेव्हा खाद्यतेलांची किमती वाढतात, तेव्हा भारतातही वाढतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढण्यामागे विविध कारणे असतात.
आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार इंडोनेशिया मलेशिया आणि अर्जेंटिना हे प्रमुख तीन देश आहेत जिथे सर्वात जास्त तेल उत्पादन होते. तेल उत्पादन करण्यासाठी तुम्हाला प्रमुख म्हणजे शेंगदाणा सोयाबीन अशा गोष्टी शेतामध्ये पिकवावे लागतात आणि त्यानंतर उत्पादन होते. परंतु त्यांच्या देशामध्ये झालेल्या हवामान बदलामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे बाजारपेठेमध्ये जो कच्चा माल असतो तो आला नाही. आणि परिणाम त्याचा असा झाला की खाद्य दलाची किमती वाढल्या.
इंडोनेशिया देशांमध्ये पाम ओईल चे उत्पादन सर्वात जास्त होते. परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15 टक्क्यांनी उत्पादन कमी झालेले आहे. कमी झालेले उत्पादन आणि वाढती मांडणी यामुळे किमती वाढत आहेत. मधल्या काळामध्ये कोरोनाच्या महामारी महामारीमुळे आता प्रत्येक देश हा स्वतःसाठी जास्त प्रमाणामध्ये तेल बिया साठवणूक करून ठेवत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये आवक कमी होत आहे. साठवणूक जास्त वाढल्याने सुद्धा किमती अजून वाढत आहेत.
आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अमेरिका आणि चीन यांचे त्यांना वाढत आहेत. यामुळे सुद्धा तेलबियांच्या किंवा कच्च्या मालांच्या वाहतुकीमध्ये खर्च वाढतो. सध्या डॉलरची किंमत ही रुपयांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणे वाढत आहे. यामुळे सुद्धा तेल बियांचे आयात करताना आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात या कारणाने सुद्धा तेलांचे भाव वाढत आहेत.
खाद्यतेलांची सध्याचे सध्याची किंमत
भारतीय बाजारपेठेमध्ये विविध तेलांच्या किमती आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन ची किंमत 110 रुपये प्रति लिटर होती परंतु तीच आता 130 रुपये प्रति लिटर पर्यंत गेली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 115 रुपये प्रति लिटर होती आणि ती आता 130 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. शेंगदाणा तेलाची किंमत ही 175 रुपयांवरून 185 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे.
सोयाबीन तेल हे सामान्य नागरिक जास्त प्रमाणात वापरतात. सोयाबीन तेलाची डिमांड जास्त आहे आणि आवक कमी असल्याने या तेलाची किंमत सर्वांपेक्षा जास्त वाढली आहे. भारत हा वापरण्यात येणाऱ्या सर्व तेलांपैकी 70 टक्के तेल हे दुसऱ्या देशांमधून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये होणाऱ्या घडामोडी डायरेक्ट आपल्या येथील तेलांच्या दरांवर परिणाम करतात.
आपल्या देशामध्ये सुद्धा सोयाबीन शेंगदाणा अशा पिकांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये घट झाली या पिकांना पावसाने साथ न दिल्याने पिकांचे उत्पादन कमी झाले बाजारपेठेमध्ये आवक कमी झाली.
खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने सामान्यांच्या घर खर्चावर परिणाम
जर चार जणांचे कुटुंब असेल आणि चार जणांना महिन्याला पाच लिटर तेल लागत असेल, तर आता या पाच लिटरचा खर्च 550 रुपयांवरून 650 रुपये एवढा झाला आहे. खाद्यतेला सोबतच भाज्या कडधान्य दूध अशा दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तूंचे किमती सुद्धा वाढले आहे. त्यामुळे सामान्यांच्या घर खर्चामध्ये एकूणच पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे.
केंद्र सरकारच्या उपाययोजना
केंद्र सरकार हे वाढत्या खाद्यतेलाच्या किमती रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे तसेच निर्यातीचा विचार करत आहे निर्यात बंद करावी लागेल त्यानंतर जे कोणी सोयाबीन शेंगदाणा या इतर पिकांची कुणी साठवण करत असेल त्यावर साठेबाजी रोखण्यासाठी विशेष पथकांचा वापर करण्यात येईल