या लोकांकडून सरकार वसूल करणार 10 हजार रुपये दंड

Duplicate pan card penalty केंद्र सरकार आता मोठ्या गतीने विविध विभागांमध्ये बदल करत आहे. प्रत्येक गोष्ट आधुनिक आणि डिजिटल करत आहे. या डिजिटल युगामध्ये अद्यावत असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने खूप मोठे प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आणि डिजिटल झाल्याने प्रत्येकांचा डाटा आणि त्यांना मिळणारे सुविधा हे एका क्लिकवर लोकांना देता येतात. केंद्र सरकारने आता विविध पद्धतींचे कागदपत्र सुद्धा अद्यावत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहेत. आपल्या सर्व कागदपत्रांमधील सर्वात महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड.

पॅन कार्ड 2.O (pan card 2.0)

पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. यावर तुमच्याकडे किती बँक अकाउंट आहे, तुमच्या बँकेने किती पैसे आहेत, तुम्ही किती कर्ज घेतलेलं आहे, तुमच्या नावावर गाड्या किती आहेत इतर सर्व गोष्टींसाठी पॅन कार्डचा वापर होतो. पॅन कार्ड च्या मदतीने तुम्ही इन्कम टॅक्स भरू शकता तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे सरकारला कळतं. केंद्र सरकारने या पॅन कार्ड मध्ये बदल केले आहेत सरकारने पॅन कार्ड 2.O हे नवीन पॅन कार्ड मार्केटमध्ये आणले आहे.

नवीन पॅन कार्ड बाजारात आणण्याचे कारण म्हणजे काही माणसांकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आहेत. एका पेक्षा जास्त पॅन कार्ड असल्याने सरकार त्यांचे उत्पन्न सोर्स आणि होणारे वार्षिक उत्पन्न ट्रेक करू शकत नाही. आणि ते एकापेक्षा अधिक पॅन कार्ड वापरून घोटाळा करतात. सरकारला द्यावा लागणारा टॅक्स चुकवण्यासाठी मुख्यतः दोन पॅन कार्डचा वापर होतो.

डुप्लिकेट पॅन कार्ड दंड Duplicate pan penalty

त्यामुळे आता आयकर विभागाने डुबलीकेट पॅन कार्ड असणाऱ्या लोकांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. नवीन नियम असं सांगतो की जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असतील तर तुम्हाला ते आयकर विभागांमध्ये जमा करायचे आहे. जर तुम्ही ते जमा केले नाही तर तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

प्राप्तिकर कायदा 1961 नुसार या कायद्यात असे सांगितले आहे की, एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरता येणार नाही. जर एखाद्याने जाणून-बुजून किंवा चुकून डुबलीकेट नवीन एखादे पॅन कार्ड बनवले तर ते त्याला लवकरात लवकर आयकर विभागाकडे द्यावे लागेल. केंद्र सरकारने आत्ताच पॅन कार्ड चे नवीन व्हर्जन ला मान्यता दिलेली आहे.PAN आणि TAN या दोन्ही कार्डचे केंद्र सरकारला व्यवस्थापन सुलभ आणि आधुनिक पद्धतीने करायचे आहे.

डुबलीकेट पॅन कार्डद्वारे आयकर विभागाची फसवणूक केली जाते त्यामुळे ही फसवणूक रोखणे हा एक मोठा उद्देश आहे. तसेच केंद्र सरकारने सांगितले आहे की पॅन कार्ड आणि tan कार्ड वाघ लवकरात लवकर काढण्यात यावे आणि त्यांची प्रक्रिया सुलभ हवी यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करणार आहे. या गोष्टीसाठी केंद्र सरकारने नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली आहे आणि या टेक्नॉलॉजीनुसार आता एका व्यक्तीकडे एकच पॅन कार्ड असेल.

 तुमच्याकडे डबल पॅन कार्ड असेल तर काय करायचे ? Duplicate pan card form

  • जर तुमच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड असेल तर ते तुम्हाला ताबडतोब आयकर विभागामध्ये सरेंडर करावे लागेल.
  • यासाठी ऑनलाइन सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे.
  • सर्वप्रथम तुम्हाला NSDL किंवा UTIITSL यांच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे गेल्यानंतर तुम्हाला पॅन सरेंडर म्हणून ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा आणि येणारा फॉर्म भरा.
  • फॉर्म भरताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित द्या त्यानंतर आवश्यक असणारी ती कागदपत्रे अपलोड करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट या बटणावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सरेंडर केलेल्या पॅन कार्डची पावती मिळेल.

जेव्हा तुम्ही पॅन कार्ड सरेंडर करणारा त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जे तुमच्या ओरिजनल पॅनकार्ड आहे ते आधार कार्ड सिलिंग केलेले असले पाहिजे. जे आधार कार्डशी लिंक आहे असे पॅन कार्ड सबमिट करू नका, सरेंडर करू नका. जे पॅन कार्ड अनावश्यक आहे आणि आधार कार्ड ची लिंक नाही, असेच पॅन कार्ड तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे. नाहीतर तुम्हाला टॅक्स भरताना, बँक खाते खोलताना अडचण येईल.

Leave a Comment