Bank Holidays मार्च महिन्यामध्ये इतक्या दिवस राहणार बँका बंद

Bank Holidays नमस्कार मित्रांनो आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि मार्च महिना सुरू होत आहे. तर मित्रांनो दर महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. पहिली गोष्ट म्हणजे येणाऱ्या महिन्यांमध्ये किती दिवस बँकांना सुट्ट्या राहतील. शाळांना सुट्ट्या राहतील सरकारी सुट्ट्या किती असतील. त्यानंतर दैनंदिन जीवनातील जी वस्तू आपण वापरतो या वस्तूंचे भाव बदलत आहेत का ? जसे की घरगुती सिलेंडर दर,पेट्रोल डिझेलचे दर सरकार काही नवीन निर्णय घेत आहे का ? अशा विविध गोष्टी महिना बदलल तशा बदलत असतात. मित्रांनो आज आपण मार्च महिन्यामध्ये बँकांना किती सुट्टी आहेत आणि ते कोणत्या कारणांसाठी दिल्या गेल्या आहेत या गोष्टींची माहिती घेणार आहोत.

मार्च महिन्यामध्ये आपला सर्वात मोठा सण म्हणजे होळी असणार आहे. त्यामुळे देशभरामध्ये या सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. या दिवशी सर्व बँका शाळा आणि सरकारी कार्यालय बंद राहणार आहेत. मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या सुट्ट्या काही देश पातळीवर लागू असतील, तर काही राज्य पातळीवर लागू असतील. यामध्ये प्रत्येक राज्याने आपापले निर्णय घ्यायचे असतात. परंतु ज्या सुट्ट्या ठरवून दिलेल्या आहेत त्या सुट्ट्या तर सगळ्यांना कन्फर्म मिळणार आहेत.

बँकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला बँक बंद राहतात किंवा चालूही राहतात यामध्ये बँकांचे वेळापत्रक ठरलेले असते हे वेळापत्रक राज्यानुसार ठरलेले असते.

बँकेचे वेळापत्रक आपल्याला समजल्याने आपण सुद्धा आपल्या आर्थिक नियोजनाची सुरुवात करू शकतो. त्या पद्धतीने पैसे जमा करणे, काढणे किंवा आर्थिक व्यवहार करणे, या संदर्भात निर्णय घेऊ शकतो. मार्च महिन्यामध्ये काही दोन-तीन दिवसांच्या सुट्ट्या तुम्हाला सलग मिळणार आहेत. जेणेकरून याचा फायदा म्हणजे तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुटुंबासोबत वेळ घालू शकता. तुम्ही कुठे फिरायला जाण्यासाठी सुद्धा प्लॅन करू शकता.

जेव्हा राष्ट्रीय सुट्टी जाहीर केलेले असते ती सुट्टी संपूर्ण भारतामध्ये लागू असते आणि या दिवशी सर्वांना सुट्टी द्यावी लागते. जेव्हा प्रादेशिक पातळीवर सुट्ट्या असतात, त्या सुट्ट्या त्या त्या प्रादेशापुरत्याच मर्यादित असतात. त्यांना राष्ट्रीय स्तरावर ग्राह्य धरला जात नाही.

March Bank Holidays आता पाहूया की मार्च महिन्यामध्ये किती सुट्ट्या आहेत.

  • 1 मार्च रोजी रामकृष्ण जयंती आहे. यामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आसाम मध्ये या दिवशी सुट्टी राहील.
  • 13 मार्च रोजी छोटी होळी, होलिका दहन, यासाठी देशभर सुट्टी लागू असेल.
  • 14 मार्च रोजी होळी हा सण आहे आणि या सणानिमित्त संपूर्ण देशभर सुट्टी आहे.
  • 20 मार्च रोजी पारसी नववर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या दिवशी सुट्टी राहील

शनिवार रविवार सुट्टी

मित्रांनो हे झाले सणांच्या सुट्ट्या. याशिवाय शनिवार रविवार या गोष्टी तर प्रत्येक महिन्यात असतातच आणि या दिवशी सुद्धा बँका बंद राहतात. तर मित्रांनो याच्या तारखा पाहू रविवार दिनांक 2 मार्च नऊ मार्च 16 मार्च 23 मार्च आणि 30 मार्च या दिवशी रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर बँकेच्या नियमाप्रमाणे दुसरा आणि चौथा शनिवार म्हणजेच 8 आणि 22 मार्च रोजी बँका बंदरातील.

मार्च महिन्यामध्ये शनिवार रविवार धरून सणांच्या पण खूप साऱ्या सुट्ट्या आहेत. तसेच आपला सर्वात मोठा सण होळी हा सुद्धा संपूर्ण देशभर साजरा केला जाणार आहे. या सगळ्या निमित्त सुद्धा संपूर्ण देशभरात सुट्टी जाहीर केलेली आहे.

गुढीपाडवा सण

महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणानिमित्त 30 मार्च रोजी सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु तीस मार्च रोजी रविवार आल्याने या सणासाठी वेगळी सुट्टी जाहीर करणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते.

जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर सुट्ट्यांची नियोजन करूनच बाहेर फिरायला जा

Leave a Comment