Anganwadi Sevika bharti नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाने काढलेल्या नोकरीबद्दल माहिती घेणार आहोत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची महिला व बाल विकास मंडळातर्फे मेगा भरती चालू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या भरतीसाठी लागणारी पात्रता कागदपत्रे शैक्षणिक अट अर्ज कुठे सर्व गोष्टींची माहिती आपण पाहू.
तर मित्रांनो या भरती अंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका यांची पदे भरले जाणार आहेत. तसेच 13243 अंगणवाडी मदतनीस यांची सुद्धा पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांना मोठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आणि सरकारी नोकरी सुद्धा मिळणार आहे.
मित्रांनो राज्याच्या सामाजिक विकासासाठी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांची भूमिका खूप मोठी आहे. या सेविकांमार्फत बालकांच्या आरोग्य पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी यांच्यावर दिलेली असते. त्यामुळे या पदांसाठी योग्य महिलांची निवड करणे, हे अत्यंत आवश्यक आहे.
भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता Educational Qualification
अंगणवाडी सेविका या पदासाठी कमीत कमी तुम्ही बारावी पास असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे उच्च शिक्षण घेतलेली पदवी असेल तर तुम्हाला सर्वात पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. जर तुम्ही पदवीधर किंवा बीएड केलेले असाल तर तुम्हाला अधिक गुण मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर प्रशिक्षण केलेले प्रमाणपत्र म्हणजेच MS-CIT चे प्रमाणपत्र असेल, तर तुम्हाला अधिक प्राधान्य मिळेल.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे Documents required for recruitment
त्यांची लिस्ट खालील प्रमाणे पाहूया पहिला कागद म्हणजे रहिवासी दाखला तुम्हाला रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी हा ते सिद्ध होते. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बारावी पास झाल्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.आणि जर तुम्ही उच्चशिक्षित असाल तर त्या उच्च शिक्षणाप्रमाणे कागदपत्र देणे सुद्धा आवश्यक आहे.मित्रांनो पुढे या योजनेमध्ये तुम्हाला जात प्रमाणपत्र सुद्धा जोडावे लागेल. आरक्षित व प्रवर्गातील महिलांसाठी हे महत्त्वाचे आहे. तुम्ही जे सर्टिफिकेट जमा करणार आहात त्या कास्ट सर्टिफिकेट वर मोठ्या सक्षम अधिकाऱ्याची सही असणे आवश्यक आहे. जर उमेदवार विधवा किंवा अनाथ असेल, तर अशा उमेदवारांसाठी लागणारे संबंधित कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया Application process
मित्रांनो ही योजना जिल्हा निहाय राबवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याने त्यांची स्वतंत्र एक जाहिरात तयार केलेले आहे. तुम्हाला ती वाचवी लागेल.
तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जाहिरातीनुसार अर्ज करावा लागेल. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज ची सुविधा दिलेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन अर्जाची सुविधा दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो जेवढे बी तुम्ही कागदपत्रे भरतीसाठी जोडणारा त्यावर स्वतःची स्वाक्षरी करा
निवड प्रक्रिया
आपण जर पाहिले तर आपल्याकडे जर अधिकचे शिक्षण असेल तर आपल्याला प्राधान्य लवकर मिळेल. त्यानंतर जर तुम्हाला अंगणवाडीच्या कामाचा अनुभव असेल, तर तरीसुद्धा तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच तुम्ही स्थानिक गावातील रहिवासी असाल तर तुम्हाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.
जर तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसची नोकरी भेटल्यानंतर तुम्हाला नियमित वेतन आणि भत्ते मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला इतर सरकारी नोकऱ्यांचे सर्व फायदे सुद्धा मिळणार आहेत. भविष्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी सुद्धा सरकारतर्फे दिले जाणार आहेत. आणि विशेषतः तुम्हाला समाजसेवेची संधी सुद्धा या नोकरीतून मिळणार आहे
मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट काळजीपूर्वक वाचा. भरतीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे स्वतःजवळ तयार ठेवा. अर्जाची अंतिम मुदत लक्षात घ्या आणि आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करा.