Aditi tatkare april installment राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ मागील वर्षी जुलैमध्ये सुरू केली. या योजनेद्वारे पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले आहेत, ज्यात मार्च महिन्याचा हप्ताही समाविष्ट आहे.
लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढणारा आर्थिक भार आणि इतर योजनांसाठीचा निधी या योजनेकडे वळवला जात असल्याच्या आरोपांमुळे ही योजना चर्चेत आहे. तसेच, काही अपात्र महिलांना वगळल्यामुळेही वाद निर्माण झाला आहे. तरीही, सरकारने ही योजना सुरूच राहील आणि पात्र महिलांना लाभ मिळत राहील, असे स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा केली होती. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होण्याची शक्यता होती, पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “सध्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळत आहेत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर २१०० रुपये दिले जातील. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल आणि आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ,” असे शिंदे म्हणाले.