Aditi tatkare नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना चालू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये खात्यात जमा केले जातात. ही योजना चालू केल्यापासून महिलांना खूप मोठा आर्थिक फायदा झालेला आहे. कारण की प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आले, त्यांना घर खर्चामध्ये मदत होत आहे.
महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीपर्यंतचे सर्व पैसे पडलेले आहेत. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांची उत्सुकता लागलेली आहे. तर मित्रांनो याच दोन हप्त्यांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, की हा हप्ता कधी महिलांच्या बँकेतील जमा होणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे.
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांना त्यांचा फेब्रुवारी हप्ता 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी मिळणार आहे. ८ मार्च रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणार खर्चासाठी या पैशांची मदत होईल. मित्रांनो सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. त्यामुळे सध्या हप्ता देणे जमणार नाही आणि अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जातील.
मित्रांनो या महिन्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये जमा होतील. फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सरकारने चालू केली होती, तेव्हा सरकारचा उद्देश हा होता की महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत मिळते आणि त्यांच्या आत्मनिर्भरतीला चालना मिळते.
या योजनेचा लाभ विशेषता ग्रामीण भागातील महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे. महिलांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळत असल्याने त्यांच्या जीवनशैलीमध्ये मोठा फरक झाला आहे. फेब्रुवारी महिना संपून गेला तरीही महिलांचे बँकेचे पैसे न आल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. डिसेंबर आणि जानेवारी चे पैसे महिलांना वेळेवर मिळाले परंतु आता फेब्रुवारीचे पैसे न मिळाल्याने विरोधकही सरकारवर टीका करत आहेत. महाराष्ट्रातील महिलाही सध्या नाराज आहेत. परंतु आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना खूप मोठी गेम चेंजर ठरली. या योजनेमुळे महायुती सरकारला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले आणि त्यांचे सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये आले. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले. या योजनेअंतर्गत ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत अशांना या योजनेतून अपात्र करण्यात आले. सर्व नियमांची पडताळणी झाल्यानंतर राज्यातील जवळपास आठ लाख महिला अपात्र ठरल्या
मित्रांनो ही योजना जुलै महिन्यात सुरू झाली. जुलै 2024 मध्ये या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत. सरकार आता या योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीस रुपये करण्याचा विचार करत आहे आणि यावर लवकरच सरकार निर्णय घेईल याची शक्यता आहे